कारच्या काचा फोडून, चालकावर वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – खेड, कुरळी फाटा येथे दुचाकी आडवी घालून, कार थांबवून, कारची तोडफोड करण्यात आली.  आणि चालकालाही मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

या प्रकरणी राकेश प्रकाश अत्तरदे (३४, रा. मोशी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश हे त्यांच्या कार मधून जात असताना कुरुळी फाटा येथे तीन मोटरसायकलस्वार कारला आडवे आले. यामुळे राकेश यांनी कार थांबविली.या टोळक्याने लाकडी दांडके, कोयत्याने कारची तोडफोड केली. राकेश यांच्या हातावर आणि डोक्यात कोयत्याने वार केले. तर एकाने कारची फोडलेली काच राकेश यांच्या पाठीत मारली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.