पुण्यात जमिनीच्या वादातून महिलेवर भर रस्त्यात वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या वादातून नातेवाईक महिलेवर भर रस्त्यावत वार केले. महिलेवर वार करून पळून जात असताना नागरिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने नागरिकांवर बंदूक रोखत त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आलम शेख या युवकाने जिवाची पर्वा न करता आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

महर्षी नगर येथील एका इसमाने जमिनीच्या वादातून नातेवाईक महिलेवर भर रस्त्यात वार केले. वार करून पळून जात असताना आलम शेख या युवकाने त्याला पकडून त्याच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतली. सर्व नागरिकांनी आरोपीला पिस्तुल सह पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी आरोपीला महर्षी नगर येथे ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीकडे चौकशी करत असताना त्याचा भाऊ त्या ठिकाणी आला. त्यावेळी आरोपीने पोलिसांसमोर चुलत भावाला तुमच्या सगळ्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कण्याचे काम सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –