… अन्यथा तबलिगी जमातींवर खुन आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार : DGP अनिल रातुरी

वृत्तसंस्था – ज्या लोकांचा तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभाग होता त्यांनी त्यांची माहिती 24 तासाच्या आत समोर येऊन द्यावी अन्यथा त्यांच्यावर खुन आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अनिल रातुरी यांनी सांगितले आहे.

दिल्ली येथील निझामुद्दीनमध्ये तबलिगी जमातींनी मकरजचे आयोजन केले होते. त्यास देशातील तब्बल 17 हून अधिक राज्यातून लोक गेले होते. तबलिगी जमातींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आतापर्यंत हजारो तबलिगी जमातींना क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, सर्वप्रथम जमातीच्या दिल्ली येथील कार्यक्रमास हजेरी लावणार्‍या तेलंगणामधील 6 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि त्यानंतर हळुहळु माहिती येण्यास सुरवात झाली. सर्वच राज्यांनी तबलिगी जमातींना स्वतःहून समोर येवुन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

काही ठिकाणी जमातींनी स्वतःहून समोर येवून माहिती देण्यास सुरवात केली आहे मात्र काही ठिकाणी अद्यापही कोणी माहिती देत नाही. त्याच पार्श्वभुमीवर उत्तराखंडचे पोलिस महासंचालक यांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हजेरी लावणार्‍यांना अतिशय कडक शब्दात इशारा दिला आहे. ज्या लोकांनी तबलिगी जमातीच्या कार्यक्रमास हजेरी लावली आहे त्यांनी 24 तासाच्या आत स्वतःहून समोर येवुन माहिती द्यावी अन्यथा त्यांच्याविरूध्द खुन आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like