ऑडी Q8 लग्झरी कार भारतात ‘लाँच’ ! पहिला ग्राहकचं ‘विराट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्झरी कार बनवणाऱ्या जर्मन कंपनीने ऑडी Q8 आता भारतात लाँच केली आहे. भारतात केवळ २०० ऑडी Q8 लग्झरी कार विकण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या लग्झरी कारचा पहिला ग्राहक हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बनला आहे. या कारच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे ही कार फक्त ५.९९ सेकंदात जवळपास १०० किलोमीटरचा वेग पकडते. तसेच ताशी २५० किलोमीटर धावते.

ऑडीने आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही कार Q8 ला केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उतरवले आहे. या कारमध्ये बीएस ६ इंधन उत्सर्जन असलेला ४८ व्ही माइल्ड हायब्रिड सिस्टमसहित ३ लीटर, व्ही६ टर्बो – पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या इंजिनचे पॉवर ३४० एचपी आहे तर ५०० एनएम निर्माण करते. तसेच या ऑडी Q8 लग्झरी कारच्या क्यू८ च्या इंजिनमध्ये ८ स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच कंपनीने दावा केलेला आहे की, ही ऑडी Q8 लग्झरी कार ५.९ सेकंदात १०० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडू शकते. तसेच जास्तीत जास्त २५० किलोमीटर प्रति तास इतका वेग या कारचा असणार आहे, असा देखील दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या कार मध्ये लगेजसाठी जास्तीचा स्पेस देण्यात आला आहे. तसेच कारमध्ये सामान ठेवण्यासाठी १७५५ लिटर स्पेस दिली आहे. तसेच या कारची ४.९९ मीटर लांबी, २ मीटर रुंदी तर १.७१ मीटर उंची असणार आहे. तसेच या कारची एक्स शोरूम किंमत १.३३ कोटी रुपये इतकी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/