Aurangabad ACB Trap | कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना जलसंपदा विभागाचा सहाय्यक अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यासाठी व नोकरीत सवलत देण्यासाठी 5 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) अंबड तालुक्यातील गलाटी मध्यम प्रकल्प (Galati Medium Project) शाखा शाहपुर सहाय्यक अभियंत्याला (Assistant Engineer) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. बुद्धभुषण सुखदेव दाभाडे Buddhabhushan Sukhdev Dabhade (वय-31) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.13) केली.तक्रारदार हे दाभाडे यांच्या कार्य़ालयात कर्मचारी आहेत. दाभाडे यांनी तक्रारदार यांना गैरवर्तन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली होती. ही नोटीस रद्द करण्यासाठी तसेच नोकरीत सवलत देण्यासाठी दाभाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पडताळणी केली असता दभाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना बुद्धभुषण दाभाडे यांना रंगेहात पकडण्यात आले.
दाभाडे यांच्यावर छावणी औरंगाबाद शहर पोलीस ठाण्यात
(Chawani Cantonment Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा
(FIR) दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप राजपुत (Police Inspector Sandeep Rajput) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित
(DySP Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपुत,
पोलीस अंमलदार बाळु थोरात, दत्तात्रय होरकटे, केवलसिंग घुसींगे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Aurangabad ACB Trap | Assistant Engineer
of Water Resources Department caught in anti-corruption net while accepting Rs 5,000 bribe to cancel show cause notice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik MLC Election | भाजप सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार?, देवेंद्र फडणवीसांनी ठेवला सस्पेन्स, म्हणाले-‘वाट पहा…’

Sandeep Lamichhane | बलात्काराचा आरोप असलेल्या ‘या’ क्रिकेटरला अखेर मिळाला जामीन

Pune PMC News | महापालिकांचे उत्पन्न आणि खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी मेन्टेनन्सचे प्रकल्पही पीपीपी तत्वावर राबविणे उचित; जी २० परिषदेच्या निमित्ताने आयोजित महापालिका आयुक्तांच्या परिषदेतील चर्चेतील तज्ज्ञांचा सूर