Sandeep Lamichhane | बलात्काराचा आरोप असलेल्या ‘या’ क्रिकेटरला अखेर मिळाला जामीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Sandeep Lamichhane | नेपाळचा स्टार क्रिकेटर आणि माजी कॅप्टन संदीप लामिछानेवर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. संदीप कॅरेबियाई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना त्याच्यावर हा आरोप करण्यात आला. यानंतर आता नेपाळच्या न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या संदीप लामिछानेला जामीन मंजूर करून त्याची सुटका केली आहे. (Sandeep Lamichhane)

काय आहे नेमके प्रकरण?


8 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळच्या न्यायालयाने इंटरनॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन संदीप लामिछानेच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काठमांडू येथील हॉटेलच्या खोलीत त्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पाटन उच्च न्यायालयाने 20 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर लामिछानेची सुटका केली आहे. लामिछानेला बलात्काराच्या आरोपाखाली ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. न्यायाधीश ध्रुवराज नंदा आणि रमेश धाकल यांच्या संयुक्त पीठाने निर्णय देत संदीप लामिछानेची जामिनावर सुटका केली आहे. पीडित अल्पवयीन तरुणीने 5 सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात संदीप लामिछानेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. (Sandeep Lamichhane)

संदीप लामिछानेची कारकीर्द

लेग स्पिनर संदीप लामिछाने हा नेपाळचा सर्वात मोठा हाय प्रोफाइल क्रिकेटर आहे. IPL मध्ये खेळणारा नेपाळचा तो पहिला क्रिकेटर आहे. 2018 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून डेब्यु केला होता.

Web Title :- Sandeep Lamichhane | sandeep lamichhane released from nepal court on bail in rape case former ipl player

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सल्ला

Byculla District Jail | भायखळा कारागृहात महिला बंद्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘नन्हे कदम’ बालवाडी व हिरकणी कक्ष, राज्यातील पहिलाच उपक्रम

Gauri Khan | गौरी खान तिच्या लूकमुळे होते वायरल; चाहते करत आहेत कौतुक

Pune Unauthorized School | ‘त्या’ शाळांवर गुन्हा दाखल करा, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनन लाल ड्रेस मध्ये दिसते एकदम हॉट; फोटोवर कौतुकांचा वर्षाव