Aurangabad Accident | गुजरात डेपोच्या बसचा महाराष्ट्रामध्ये भीषण अपघात; 15 जण थोडक्यात बचावले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Accident | औरंगाबादमध्ये गुजरात डेपोच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हि बस औरंगाबादवरून अहमदाबादकडे जात असताना कन्नडजवळ हा अपघात झाला. कन्नड गावाजवळील काश्मीरा हॉटेल समोर पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हि बस झाडाला जाऊन आदळली. हि धडक एवढी भीषण होती कि बसच्या समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. या अपघातात (Aurangabad Accident) बसमधील अंदाजे 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असून, जखमींना कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू मध्ये असाच एक भीषण अपघात झाला होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसमध्ये भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला होता. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. हि अपघातग्रस्त कार गुजरातहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला होता. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने बसला धडक दिली आणि हा अपघात झाला. (Aurangabad Accident)

अपघातग्रस्त कार मुंबईच्या दिशेने निघाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास कार चारोटी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ
महामार्गावर आली असता कार चालकाने अचानक लेन बदलली आणि कार लक्झरी बसला धडकली.
या अपघातात कारचालकासह कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
पालघर पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Aurangabad Accident | bus accident aurangabad of gujarat depot bus
in maharashtra 15 passengers escaped

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा