Pune Pimpri Chinchwad Crime | बनावट सोने तारण ठेवून 27 लाखाचे कर्ज घेणाऱ्या दोघांना अटक, निगडी परिसरातील घटना

0
208
Pune Pimpri Chinchwad Crime | Two arrested for borrowing 27 lakhs by pledging fake gold, incident in Nigdi area
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | बनावट सोन्याचे दागिने (Fake Gold Jewelry) तारण ठेवून तब्बल 27 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज (Gold Loan) घेऊन हिमगिरी हायर पर्चेस लि. ची (Himgiri Hire Purchase Ltd.) फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 19 मार्च 2021 ते 25 मार्च 2022 या कालावधीत घडला आहे.

याबाबत हिमगिरी हायर पर्चेस लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राजमल जैन (वय-52) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष भागवत बागल (वय-40 रा. किवळे), राहुल भीमाप्पा बालीगर (वय-40 रा. देहुरोड), सुनिल काशिनाथ वाघमारे (वय-47 रा. विकासनगर, किवळे) यांच्यावर आयपीसी 420, 34, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन संतोष बागल आणि सुनील वाघमारे यांना अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमगिरी हायर पर्चेस लि. ही कंपनी सोने तारण घेऊन कर्ज वितरण करते.
आरोपींनी 813.7 ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणले.
सोने खरेदीच्या बनावट पावत्या दाखवून कंपनीकडून 27 लाख 80 हजार 100 रुपयांचे कर्ज घेतले.
घेतलेले कर्ज परत न करता कंपनीची फसवणूक केली.
दरम्यान सोने बनावट असल्याचे समजल्यानंतर कंपनीने पैशांची मागणी केली.
त्यावेळी संतोष बागल याने फोन करुन कंपनीच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-Pune Pimpri Chinchwad Crime | Two arrested for borrowing 27 lakhs by pledging fake gold, incident in Nigdi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, भोसरी मधील प्रकार

Neha Malik | नेहा मलिकचा बोल्ड अंदाज; कर्वी फिगर करत वेधले सर्वांचे लक्ष