Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ घातल्याप्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृह या संस्थेमध्ये रात्री उशिरा बेकादेशीरपणे प्रवेश करुन संस्थासंचालकांना आर्वाच्या भाषेमध्ये शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) पतीत पावनचे श्रीकांत शिळीमकर (Shrikant Shilimkar) यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर Sunil Redekar (वय ५७, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७/२३) दिली आहे. हा प्रकार पुणे विद्यार्थी गृहात ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते ४ फेब्रुरवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे विद्यार्थी गृह या शिक्षण संस्थेमध्ये सध्या संचालक मंडळामध्ये कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. संस्थेमध्ये रेणुका गोडबोले या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेविका म्हणून नोकरीस आहे. संस्थेमध्ये सेवकांच्या तसेच स्वत:च्या पगारावरुन पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीच्या संदर्भात वाद घालत असतात. गोडबोले यांच्या सांगण्यावरुन श्रीकांत शिळीमकर यांनी ३० ते ४० जणांना घेऊन रात्री पुणे विद्यार्थी गृह संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगी व इतर नातेवाईकांसमोर फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करुन अपमानीत करुन जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभारे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against 30 to 40 people
in connection with the disturbance in Pune student hostel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा