Chandrashekhar Bawankule | ‘राज्यातील पोटनिवडणुका बिनविरोधाची परंपरा ‘या’ नेत्यांनी जपावी..;’ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वपक्षीय नेत्यांना साद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Bypolls) जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजपकडून कसबा मतदारसंघातून हेमंत रासने (Hemant Rasne) तर चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडी (MVA) देखील या जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप (BJP) ही निवडणुक बिनविरोध व्हावी. यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याबद्दलचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.

 

आज माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपाच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या.’ असे भावनिक आवाहन यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर राजकीय पक्षांना केले आहे.

तर, बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray), वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (VBA Chief Prakash Ambedkar) यांना विनंती केली की, ‘राज्यातील पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा या नेत्यांनी जपावी.’ असे म्हणत त्यांनी ही पोटनिवडणुक लढवू नये असे आवाहन बावनकुळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले.

 

दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकी या बिनविरोध व्हाव्यात यासाठी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार,
राज ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांना फोन केला असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | kasba peth and chinchwad by election
should be unopposed chandrashekhar bawankule request to all parties

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा