Lockdown : …. म्हणून मुंबईच्या बांद्रा रेल्वे स्टेशनवर मजुरांची झाली होती गर्दी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवारी दुपारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर लोकांची मोठी गर्दी जमली. लॉकडाऊन असूनही रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. घरी जाण्याकरिता लोकांनी रेल्वे स्थानकात गोंधळ उडायला सुरुवात केली, त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. दरम्यान, बाहेरील लोकांना घरी पाठवले जाईल, अशी अफवा जवळपासच्या वस्तींमध्ये पसरल्याचे समजते. त्यानंतर लोक रेल्वे स्थानकावर एकत्र येऊ लागले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख म्हणाले की, आता परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार यांच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे.

रोजंदारीवर काम करणारे मजूर बेरोजगार
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या महिन्यात लॉकडाऊन लागू केल्यापासून रोजंदारीवर काम करणारे मजूर बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जरी अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली असली तरी त्यांच्यातील बहुतेकांना प्रतिबंधांमुळे अडचणी आल्यामुळे मूळ ठिकाणी परत जायचे आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरी भागात वांद्रे (पश्चिम) बस आगारात दुपारी तीनच्या सुमारास सुमारे 1000 मजूर एकत्र आले आणि रस्त्यावर बसले. हे रोजंदारी मजूर जवळच्या पटेल नगरी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहत असून वाहतुकीच्या सुविधेची मागणी करत आहेत, जेणेकरून ते मूळ गावी परतु शकतील. ते मूळचे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील आहेत.

एका मजुराने आपले नाव न घेता सांगितले की, एनजीओ आणि स्थानिक रहिवासी प्रवासी मजुरांना भोजन पुरवित आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचे जीवनमान खराब झाले आहे.ते म्हणाले, ‘आता आम्हाला अन्न नको आहे, आम्हाला आमच्या मूळ गावी परत जायचे आहे, आम्ही लॉकडाऊन वाढवण्यासाठी घोषित केल्याने खूष नाही.’ पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी असदुल्ला शेख म्हणाले की, आम्ही आधीच लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आपली बचत खर्च केली आहे. आता आमच्याकडे खायला काही नाही, आम्हाला फक्त आमच्या मूळ जागेवर जायचे आहे, सरकारने आमच्यासाठी व्यवस्था करावी.

कामगारांना घरी पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकला नाही : आदित्य ठाकरे
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेवर महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, सध्या वांद्रे स्थानकातून मजुरांना हटविण्यात आले आहे. नुकताच सूरतमध्येही असेच घडले. कामगारांना घरी पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारला घेता आलेला नाही. त्यांना अन्न आणि निवारा नको आहे, त्यांना घरी परत जायचे आहे.