Aurangabad News | स्वत:ची किडनी देऊन आईने वाचवले मुलाचे प्राण, रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आई आणि मुलाचं नात जगातील सर्वात श्रेष्ठ नातं आहे. आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणे प्रेम करते, अडी-अडचणीत सापलेल्या आपल्या मुलांना स्वत:च्या जिवाची पर्वा न करता संकटातून बाहेर काढते. याचा प्रत्यय नुकताच औरंगाबाद (Aurangabad News) येथे आला आहे. औरंगाबाद (Aurangabad News) येथील एका महिलेनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. तिनं आपला रक्तगट वेगळा असूनही मुलाला किडनी दान (Donating Kidney) करुन आपल्या पोटच्या गोळ्याचे प्राण वाचवले (Mother Saved Her Son) आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया (Surgery) यशस्वी झाली असून आता मायलेकरांची प्रकृती उत्तम आहे.

औरंगाबादच्या (Aurangabad News) जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेले किशोर रमेश निकम (Kishore Ramesh Nikam) यांचा 18 वर्षांचा एकुलता एक मुलगा प्रतिक हा काही दिवसांपासून आजारी होती. औरंगाबाद, जळगाव (Jalgaon), पुणे (Pune) आणि हैदराबाद (Hyderabad) इत्यादी ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र काहीही फरक पडला नाही. अधिक उपचारानंतर प्रतिकच्या (Pratik Nikam) दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे लक्षात आले.

दिवसेंदिवस प्रतिकची प्रकृती खालावत चालली होती. एकुलत्या एक मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे ऐकून निकम परिवाराच्या पायाखलची जमीन सरकली.
प्रतिकची प्रकृती आणखीनच बिघडू लागल्याने त्याच्यावर डायलिसिसवर (Dialysis) जगण्याची वेळ आली.
प्रतिकचा जिव वाचवण्यासाठी किडनीचं प्रत्यारोपण करणं गरजेचं बनलं होतं.
परंतु किडनी देणार कोण हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशातच प्रतिकची आई अनिता निकम (Anita Nikam)
यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

आईने किडनी दान केली परंतु दोघांचा रक्तगट (Blood Group) वेगवेगळा होता.
त्यामुळे आणखीनच गुंतागुंत वाढली. असं असतानाही सिग्मा हॉस्पिटलचे (Sigma Hospital)तज्ज्ञ डॉक्टर गणेश बर्नेला (Dr. Ganesh Barnela), डॉ. सारुक, डॉ. अभय चिंचोले (Dr. Abhay Chinchole) इत्यादींना अथक परिश्रम घेत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली.
सध्या या दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिता यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title :- Aurangabad News | Mother saves child’s life by donating her own kidney, donates kidney despite blood group being different …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | नशा करण्यासाठी पैसे न देणार्‍या 56 वर्षीय आजीवर नातवाकडून चाकू हल्ला, पुण्यातील घटना

Aryan Khan Arrest | अखेर ‘किंग खान’ शाहरूखचा मुलगा ‘आर्यन’ला ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB कडून अटक

Crime News | रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये केला बलात्कार