Aryan Khan Arrest | अखेर ‘किंग खान’ शाहरूखचा मुलगा ‘आर्यन’ला ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB कडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Arrest | एनसीबीनं (NCB) शनिवारी रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा (Mumbai Cruise Drugs Case) मारला. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrest) याच्यासह तिघांना अटक केली आहे. यानंतर थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार असून आजच त्यांना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. एनसीबीने या क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीन अटक केलेल्या 8 जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने (Aryan Khan Arrest) कबुल केले की तो या पार्टीचा ( Mumbai Cruise Drugs Case) भाग होता. त्यानं आपण चूक केल्याची कबुलीही दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं आहे. सुरुवातीच्या चौकशीत त्याने या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनचा मोबाईलही जप्त केला आहे. ज्यात ड्रग्स संदर्भातले चॅट्स (Chats about drugs) मिळाले आहेत. सुत्रांच्या मते, जेव्हा या चॅटबद्दल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानं हौस म्हणून ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं.

 

विविध प्रकारचे ड्रग्स जप्त

या कारवाईनंतर एनसीबीने अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे,
एनसीबी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.2) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला.
या ऑपरेशन दरम्यान MDMA/एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा (FIR) 9/21 अंतर्गत दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे.

Web Title :- Aryan Khan Arrest | Mumbai Cruise Drugs Case actor shah rukh khan son aryan khan arrested by ncb in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये केला बलात्कार

Crime News | श्रीगोंद्यात 30 वर्षीय महिलेचा साडीने गळा आवळून डोक्यात वार करून निघृण खून, प्रचंड खळबळ

Pune Crime | उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना