Crime News | रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | नवी दिल्लीच्या एनसीआरजवळ असणाऱ्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि ट्रामा सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या अलिगढ जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणीवर सेंटरमधीलच एका कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये या तरुणीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी ती वॉर्डमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ती बाथरुम बाहेर रडत बसल्याचं दिसून आलं. पीडितेच्या तक्रारीनंतर नराधमाला अटक (Crime News) करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता हि फरिदाबादची असून रेल्वे अपघात झाल्याने तिला रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
तिच्या कुटुबियांदेखील याची माहिती नाही. आरोपी हा याच रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता.
तो दरवेळी वेगवेगळ्या बहाण्यानं पीडित तरुणीला मदत करण्यासाठी वॉर्डमध्ये यायचा.
गुरुवारी रात्री तरुणी बाथरुममध्ये जात असल्याचं दिसल्यानंतर आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, पीडिता वॉर्डमध्ये नसल्याचे मुख्य चिकित्सा अधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना शोध घेण्यास सांगितलं.
सुरक्षा रक्षक पीडित तरुणीचा शोध घेत असताना त्यांना रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील बाथरुममध्ये किंचाळण्याचा आवाज आला.
कर्मचारी तेथे पोहोचताच तरुणी बाथरूम मधून रडत बाहेर आली. कर्मचाऱ्यांनी नराधमाला पकडून पोलिसांच्या (Crime News) ताब्यात दिलं.

Web Title :-  Crime News | 22 years old woman admitted hospital was raped in bathroom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | श्रीगोंद्यात 30 वर्षीय महिलेचा साडीने गळा आवळून डोक्यात वार करून निघृण खून, प्रचंड खळबळ

Deglur-Biloli By-Election | देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, ‘या’ मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

Devendra Fadnavis | खा. कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही’