Pune Crime | नशा करण्यासाठी पैसे न देणार्‍या 56 वर्षीय आजीवर नातवाकडून चाकू हल्ला, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नशेचे व्यसन लागलेल्या नातवाने नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आपल्या आजीला मारहाण करुन तिच्यावर चाकूने हल्ला (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी लोहियानगरमध्ये राहणार्‍या एका 56 वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

त्यावरुन खडक पोलिसांनी ( गु. र.क़्र. 365/21) त्यांच्या 18 वर्षाच्या नातवाविरुद्ध 324, 504 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या आजी लोहियानगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलीच्या मुलाला व्यसन लागले आहे. त्यासाठी तो नेहमी आजीकडे पैसे मागत असतो. तो काही कामधंदा करीत नाही. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता त्याने आपल्या आजीकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने आपल्या आजीला लाकडी बांबुने पाठीवर व पोटावर हाताने मारले. बारीक चाकूने डाव्या कानाखाली वार करुन जखमी (Pune Crime) केले आहे. सहायक पोलीस फौजदार मोढवे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Granddaughter stabs 56-year-old grandmother for not paying for drugs, incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Arrest | अखेर ‘किंग खान’ शाहरूखचा मुलगा ‘आर्यन’ला ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB कडून अटक

Crime News | रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये केला बलात्कार

Crime News | श्रीगोंद्यात 30 वर्षीय महिलेचा साडीने गळा आवळून डोक्यात वार करून निघृण खून, प्रचंड खळबळ