औषध संपली, तुम्ही बाहेरून घेऊन या : औरंगाबाद घाटी रुग्णालयाचा प्रताप

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

संपूर्ण महाराष्ट्रातून उपचारासाठी जाणाऱ्या घाटी या शासकीय रुग्णालयाचा औषध गोळ्यांचा साठा संपल्यामुळे घाटी रुग्णालय हे घाटीत गेल्या सारखे दिऊन येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’325b212d-c562-11e8-90b3-8bd59fb21f42′]

औरंगाबाद मधील सर्वात मोठे शासकीय रुग्णायालय मानल्या जाणाऱ्या घाटी या शासकीय रुग्णालयातील औषध गोळ्यांचा साठा संपला आहे. औषधाचा साठाच शिल्लक नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे खरेदी करावे लागत आहे. इतकेच नव्हे तर गोळ्या – औषधे संपली आहेत, तुम्ही बाहेरुन ती घेऊन या असा अजब सल्ला ही रुग्णालय प्रशासनाकडून दिला जात आहे.यामुळे नायिलाजाणे , अव्वाच्या सव्वा दारात रुग्नांचे नातेवाईक औषधे – गोळ्या घेताना सध्या औरंगाबाद मध्ये दिसून येत आहे.

अस्वच्छता केल्यास लागणार दंड : मानवत नगर पालिका

विशेष म्हणजे, कायम अस्वच्छता, निवासी डॉक्टरांचे उपोषण यामुळे औरंगाबादचे घाटी रुग्नालय हे सतत चर्चेत असते. मात्र आता त्यात आणखी एक भर पडली आहे, इतकेच नव्हे तर घाटी रुग्णालयाची मोठ्याप्रमाणात थकबाकी बाकी आहे. येवढी थकबाकी बाकी असल्यामुळे औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी औषध साठा पुरविणे बंद केला आहे. मात्र औषधांचा पुरवठा थांबेपर्यंत प्रशासन काय करत होते ? असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. घाटी रुग्नालयात सध्या सलाईन वगळता इतर कुठलेही औषध उपलब्ध नाहीयेत. याशिवाय सिटीस्कॅन, एमआरआय स्कॅन यासारख्या अनेक मशिनरीही आवश्यक त्या क्रीमच्या अभावामुळे बंद आहेत.

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातूनही गोरगरीब रुग्ण येत असतात. पैस नसल्यामुळे ते गोळ्या – औषधे घेऊ शकत. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकार्‍यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत लोकप्रतिनिधीसह शासकीय रुग्णालयाचे डीन आणि इतर कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, गोळ्या – औषध पुरवठा या मुळ मुद्द्यासह खराब मशीनरी दुरुस्ती, निवासी डॉक्टरांच्या समस्या आदी बाबीवर चर्चा होण्यार असल्याचे वृत्त आहे.

[amazon_link asins=’B06XRCGFC5,B00IRY9GEM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9150d2b0-c562-11e8-81bd-cbff2c4043a2′]

 जाहीरात