‘NPR लागू करण्यापासून थांबवणार नाही, परंतु NRC लागू होणार नाही’ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या CAA कायद्याच्या विरोधात देशभरातून निषेध व्यक्त होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, ‘राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी / एनपीआर (NPR) राबविणे थांबवणार नाही. दरम्यान, मुख्यमंत्री वैयक्तिकरित्या एनपीआरचा फॉर्म तपासतील. सोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कोणालाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले की, ‘सीएए आणि एनआरसी वेगवेगळे आहेत आणि एनपीआर वेगळे आहे. राज्यात सीएएची अंमलबजावणी झाली तर काळजी करण्याची गरज नाही. पण राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही.’