AUS vs WI Test Series | पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर, ‘हा’ खेळाडू करणार ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व

पोलीसनामा ऑनलाइन टीम – AUS vs WI Test Series | ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना 8 डिसेंबर रोजी अ‍ॅडलेड या ठिकाणी खेळवला जाणार आहे. मात्र, या कसोटी अगोदर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. (AUS vs WI Test Series)

 

पॅट कमिन्सच्या जागी स्कॉट बोलंडला संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स स्नायूंच्या ताणामुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे आता त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ उरलेल्या सामन्याचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

पॅट कमिन्स वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार कामगिरी करत वेस्ट इंडीजवर मोठा विजय मिळवला होता.
या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

 

Web Title :- pat cummins has been ruled out of the series due to injury and will be replaced by steve smith as captain in aus vs wi 2nd test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना