Coronavirus : ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिन्यापर्यंत असू शकतं ‘लॉकडाउन’,लोकांना तयार राहण्यास पंतप्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया मध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की हे लॉकडाउन सहा महिन्यांपर्यंत लागू शकते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना विषाणूची 3166 लोकांना लागण झाली आहे. तर डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोमवारपासून लॉकडाउन सुरू केला आहे. कोरोना प्रकरणांची संख्या वेगाने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील सर्व पब्‍स, क्लब, जिम आणि चर्च देखील बंद करण्यात आली आहेत. सरकारची म्हणणे आहे की त्यांच्या देशातील लोकांनी सामाजिक अंतरावर अधिक लक्ष दिले पाहिजे. ऑस्ट्रेलियन सरकारने लोकांना बर्‍याचदा सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु ऑस्ट्रेलियन लोक यासाठी सहमत नव्हते. समुद्रकिनारे, रेस्टॉरंट्स, बार, पब इत्यादी ठिकाणी जाणे बंद होत नव्हते, त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संसदेत सांगितले की कामानंतर आता कुणीच पबला जाणार नाही किंवा सकाळी कोणालाही जिममध्ये जाण्याची गरज नाही. लोकांनाही कॅफेमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले की, सध्या देशासमोर मोठे आव्हान आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की ही वेळ आपल्यासाठी फार कठीण जाणार आहे. याबरोबरच त्यांनी देशवासियांना पुढील सहा महिने लॉकडाउनसाठी तयार राहावे असा इशारा देखील दिला.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक प्रकरणे व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स मधून समोर येत आहेत. 13 लोकांचा मृत्यूही झाला आहे. असे असूनही ऑस्ट्रेलियन क्वारंटाईनचा सल्ला स्वीकारत नव्हते. ऑस्ट्रेलिया सरकारकडून जनतेला सातत्याने इशारा दिला जात होता. परंतु काही नागरिक बोंडीच्या बीचवर आणि रेस्टॉरंट्सवर पोहोचत होते, लोक सामाजिक अंतराच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत होते. या दरम्यान, पब आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती.

पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की सामाजिक अंतरासाठी कडक पावले उचलली जात आहेत. प्रत्येकाने त्याचे अनुसरण केले पाहिजे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम लोक स्वतः भोगतील. पंतप्रधान मॉरिसन यांनी इनडोअर स्पोर्ट्स, घरगुती कार्यक्रम, पब, सिनेमा हॉल, बार आणि चर्च यासह अनावश्यक सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ते त्वरित बंद करण्यात आले. ऑस्ट्रेलियामधील सर्व समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये टेक अवे ऑर्डर घेतल्या जाणार आहेत तर डिलिव्हरी देखील सुरू राहणार आहे.