ऑस्ट्रेलियन PM मॉरिसन यांनी मित्र Modi यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा, Video मध्ये केले भारताचे ‘कौतूक’

कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियामध्ये रहात असलेल्या हिंदू समाजाला होळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात मॉरिसन यांनी पीएम मोदी यांना आपले चांगले मित्र म्हटले आहे. व्हिडिओ संदेशात त्यांनी होळीच्या शुभेच्छांसह भारताच्या क्षमतेचे कौतूक सुद्धा केले आहे.

केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेले भारतीय होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने भारतीय समाज राहतो, ज्यामुळे येथे सुद्धा होळी साजरी केली जाते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हिंदू समाजाला होळीच्या शुभेच्छा दिल्या. यासाठी त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा टॅग केले आहे.

व्हिडिओ संदेशात काय म्हटले…
नमस्ते म्हणत आपल्या व्हिडिओची सुरुवात करत मॉरिसन यांनी सर्वांना ‘रंगांचा अद्भूत सण’ होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मागील वर्षी महामारीमुळे होळीचा उत्साह कमी होता. कठिण काळ असल्याने होळीचा उत्साह मर्यादित करावा लागला होता. त्यांनी पुढे म्हटले ‘परंतु यावेळी आम्ही भविष्याकडे अधिक आत्मविश्वासासह पाहू शकतो. आपण त्याकाळात मोठे बलिदान दिले आहे. आपण त्या आव्हानांच्या बाबतीत सुद्धा सतर्क आहोत, ज्यांचा सामना भारतासह जगभरातील देशांना करावा लागत आहे.

पीएम मॉरिसन यांच्या संदेशाचे वैशिष्ट्य हे आहे की इंग्रजीत दिलेल्या या संदेशाच्या खाली सब टायटल्स देण्यात आले आहेत, जे हे दर्शवतात की पीएम मॉरिसन भारत आणि जगभरात पसरलेल्या हिंदी भाषिक समाजापर्यंत आपल्या संदेश पोहचवू इच्छितात.

 

 

 

 

भारताचे कौतुक
आपल्या संदेशात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी क्वॉडमध्ये भारताची भूमिका आणि व्हॅक्सीन निर्मितीच्या क्षेत्रातील क्षमतेबाबत कौतूक केले आहे. मॉरिसन यांनी म्हटले, मी जोर देऊन सांगू इच्छितो की, भारत एक महत्वाचे कार्य करत आहे. मग ते क्वाडमधील भागीदारीचे असो किंवा कोविड-19 च्या व्हॅक्सीनचे जागतिक पातळीवर उत्पादन असो, ज्यामुळे संपूर्ण जगाला मदत होत आहे. आपण एकत्र येऊन पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त करू.