2020 मध्ये मारूतीकडून पहिली ‘इलेक्ट्रिक’ कार, धावणार 200 KM पर्यंत, किंमत ‘एकदम’ कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki (मारुती सुजुकी) फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या एका Auto Expo (ऑटो एक्सपो) 2020 मध्ये आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करु शकते. एका वृत्तानुसार ही इलेक्ट्रिक कार Wagon R (वॅगन आर) वर अधारित हॅचबॅक असू शकते. कंपनी या कारचे प्रोडक्शन वर्जन सादर करेल. म्हणजेच या कार लॉन्चनंतर यात फार काही बदल होणार नाही.

180 ते 200 किमीची रेंज –
मारुती सुजुकी मागील 1 वर्षापासून आपल्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. अनेकदा ही कार स्पॉट देखील करण्यात आली आहे. असेही मानले जाते की ही कार Futuro-E असू शकते. कंपनी ही कार 180 ते 200 किमी रेंजमध्ये लॉन्च करु शकते. जी एखाद्या शहरात फिरण्यासाठी उत्तम आहे. मारुतीने नुकतेच Futuro-E नावाने ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे.

डायमेंशन –
मारुती Futuro-E मध्ये कन्वेंशनल फ्रंट ग्रिलबरोबर प्रोजेक्टर हेड लॅंप्स, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी टेललाइट्स देखील मिळेल. तसेच यात अलॉय व्हिल्स देखील देण्यात आले आहेत. याचा डायमेंशन सध्याच्या मॉडेल सारखेच असणार आहे. याची लांबी 3655 एम एम, रुंदी 1620 एमएम आणि उंची 2435 एमएम असू शकते. याचे व्हिलबेस 2435 एमएम असू शकते.

फास्ट चार्जिंगची सुविधा –
रिपोर्टनुसार Futuro-E मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टन देण्यात येऊ शकते. जो अ‍ॅपल कार प्ले आणि अ‍ॅण्ड्राइट ऑटोला सपोर्ट करेल. ही कार रेग्युलर 15 ए सॉकेटने डीसी फास्ट चार्जरने देखील चार्ज केले जाऊ शकेल. याची रेंज 130 किमीच्या आसपास असेल.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार –
या कारमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगची टेक्नॉलॉजी देऊ शकते. मारुतीसाठी चिंतेची सर्वात मोठी बाब म्हणजे देशातील अनेक ब्रांड्स त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदायने पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवल्या आहेत. मारुतीच अशी एक कंपनी राहिली आहे जिच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक वाहन नव्हते.

किंमत 7 ते 10 लाख –
अशी शक्यता आहे की मारुती इलेक्ट्रिक वाहनाचे बाजार आर्थिक वर्ष 2023 पर्यंत वाढून दोन अरब डॉलरपर्यंत पोहचू शकतो. तर अंतर्गत बाजारात सेगमेंटमध्ये सर्वात जास्त हिस्सा मारुती सुजुकीचा असेल. तर Futuro-E मारुतीचे हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल. या इलेक्ट्रिक कारची एक्स शोरुम किंमत 7 पासून 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर या कारच्या स्पर्धेत असलेली टाटा टिगोर ईव्हीची शोरुम किंमत 9.44 लाख ते 9.75 लाख रुपयांदरम्यान असेल. कंपनी Futuro-E ची विक्रीची सुरुवात काही मेट्रो शहरात नेक्सा डीलरशीपच्या माध्यमातून करु शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/