कामाची गोष्ट ! एकदम फ्री मध्ये बदला Aadhaar कार्डमधील तुमची आवश्यक माहिती, ‘इथं’ मिळतेय ही सुविधा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड मोबाइल नंबर, बँक खाते आणि बर्याच योजनांशी जोडलेला आहे, म्हणून त्यामध्ये प्रविष्ट केलेली प्रत्येक माहिती बरोबर असणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु कधीकधी आधार कार्डसाठी अर्ज करताना चुकीची माहिती भरली जाते आणि आधार कार्ड आल्यानंतर आम्हाला कळते.
Avail Aadhaar related services like free of charge enrolment & mandatory biometric updates
during the ongoing '𝗔𝗮𝗱𝗵𝗮𝗮𝗿 𝗦𝗮𝗽𝘁𝗮𝗵' (March 8-14)
at all post office & aadhaar special camps across 1293 Aadhaar Centres in Maharashtra & Goa,under Maharashtra Postal Circle pic.twitter.com/JKE4cFxYh6
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) March 11, 2020
आपणासही आपल्या आधार कार्डमध्ये काहीतरी अपडेट करायचे असेल आणि आपण महाराष्ट्रात रहता तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, आधार तयार करणारी संस्था यूआयडीएआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे की, त्यांच्या खास कार्यक्रमात ” महाराष्ट्रातील 1293 Aadhaar Centre वर आधार माहिती विनामूल्य अपडेट करण्याची सुविधा ते देत आहेत.
ही सुविधा आधार सप्ताह अंतर्गत ८ ते १४ मार्च दरम्यान लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्विट मध्ये देण्यात आली आहे. ही सुविधा महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत महाराष्ट्र आणि गोवा मधील 1293 आधार केंद्रे तसेच त्या अंतर्गत सर्व पोस्ट ऑफिस आणि आधार कॅम्प वर राबवण्यात येणार आहे.