बीडचे पत्रकार अमजद खान यांना पुरस्कार जाहीर

बीड : पोसीसनामा ऑनलाइन – येथील पत्रकार तथा आरोग्य दूत अमजद खान यांना विश्व मानवधिकार परिषदेचा एक्सलेन्स आवार्ड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित केला आहे. दि. 10 डिसेंबर 2019 रोजी परळी येथे एक विशेष कार्यक्रम घेऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

रूग्ण सेवा हीच इश्वर सेवा माणून अमजद खान हे गेल्या अनेक वर्षा पासूंन गोरगरीब लोकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना रूग्ण सेवा मिळवून देण्यासाठी काम करतात. जिल्हा रूग्णालय येथे ग्रामीण भागातील अडचणीत असलेल्या रूग्णांनाही नेहमी मदत करतात, तर त्यांनी यापुर्वी जंगलात जखमी असवस्थेत असलेल्या पाडसास रूग्णवाहीकेत आणून त्याच्यावर उपचार करून त्यास वन विभागाच्या ताब्यात दिले होते.

या कार्याची दखल घेऊन विश्व मानवाधिकारी परिषदेने त्यांना पुरस्कार घोषित केला आहे. याची घोषणा मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद लायक यांनी केली आहे. पत्रकार अमजद खान यांना पुरूस्कार घोषित होताच मित्र परिवारासह सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com

You might also like