मशिदीचे ‘अवशेष’ आम्हाला द्या ! बाबरी मशिदी अ‍ॅक्शन कमिटीची SC कडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाबरी मज्जीद समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत मज्जीदचे अवशेष समितीला देण्याची मागणी केली आहे. या अ‍ॅक्शन कमिटीशी जोडल्या गेलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, बाबरी मज्जीदचा भाग अजूनही त्या ठिकाणी आहे. या कमिटीने हे देखील म्हंटले की न्यायालयात याबाबतच्या केसवर सुनावणी सुरु असताना कधीही मज्जीदच्या अवशेषांचे काय होणार याबाबत उल्लेख करण्यात आला नव्हता.

अवशेष देण्याची केली मागणी
म्हणूनच आता कमिटीने न्यायालयाकडे जेव्हा अवशेष हटवले जातील तेव्हा ते आमच्याकडे द्या अशी मागणी केली आहे. लवकरच यासंबंधी न्यायालयात क्यूरेटिव याचिका दाखल केली जाणार आहे त्यासोबतच अवशेष सुपूर्त करण्यासाठीचा एक विशेष अर्ज देखील करण्यात येणार आहे.

2 डिसेंबरला राम जन्म भूमी विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयात पहिली पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. एम सिद्दीकी यांनी यावेळी संविधान पीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.

SC ने 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या
सद्दिकी यांच्यासोबत याप्रकरणी एकूण 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पक्षकारांकडून 9 तर इतर अन्य 9 जणांकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/