home page top 1

अयोध्या सुनावणी : सिंहाच्या चित्रावरून सुप्रीम कोर्टाचा मुस्लिम पक्षाला प्रश्‍न – ‘मशीदीमध्ये आढळतात का असे चित्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मज्जीदच्या बाबतीत एक महत्वाचे विधान केले आहे. मुसलमान पक्षाला कोर्टाने सवाल केला आहे की, बाबरीच्या उध्वस्त केलेल्या ढाच्यावर वाघांचे,पक्ष्यांचे आणि फुलांचे चित्र आढळून आले आहे. त्याबाबत कोर्टाने मुस्लिम पक्षांची बाजू मांडणाऱ्या प्रतिनिधींना सवाल केला आहे की, मज्जीदमध्ये अशी चित्रे असतात का ?

मुस्लिम पक्षांनी सांगितले की, कोणत्याच मज्जीदीमध्ये एकाही देवाचा फोटो लावलेला नसतो मात्र केवळ काही फुलांची चित्र सापडल्याने हे सांगता येणार नाही की हे ठिकाण कुराणसाठी (मुसलमानांसाठी) अनुरूप नाही किंवा इस्लामी सिध्दांतांच्या विरोधात आहे.

त्यांनी रंजन गोगोई यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटना पिठासमोर ही गोष्ट मांडली की, दरवाज्यावर सिह तसेच इतर ठिकाणी अन्य चित्रे सापडली म्हणून हिंदू पक्षाला हे सिद्ध करता येत नाही की, त्या ठिकाणी मस्जिद ऐवजी मंदिर होते. यावर कोर्टाने सांगितले की, या आधी मज्जीदमध्ये अशी काही चित्रे असतील असे कधी आढळून आले नाही. घटना पीठाने सांगितले की मज्जीदमध्ये फुलांचे आणि प्राण्यांचे फोटो असू शकत नाही तसेच घटनापीठाने यावेळी श्री धवन याना यावर एक संक्षिप्त नोट बनवून मज्जीदीचे फोटोही मागितले आहेत.

राजीव धवन यांनी सुन्नी वक्फ बोर्डाच्या व आठव्या दिवशी वाद घालणारे आणि वास्तविक फिर्यादी एम सिद्दीक यांच्यासह खंडपीठाला सांगितले की हिंदू पक्षांच्या या चित्रांवर विश्वास ठेऊन “काहीच सिद्ध होत नाही”.

visit : Policenama.com 

Loading...
You might also like