अयोध्या विवाद प्रकरण : मध्यस्थीसाठी न्यायालयाने नेमली ३ सदस्यीय समिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या राममंदिर-बाबरी मशिद प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने या वाद मध्यस्थीने मिटवण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीला मध्यस्थी करण्यासाठी ८ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तर चार आठवड्यात प्रगती अहवाल न्यायालयात सादर करण्याचे न्यायालयाच्या वतीने या समितीला बंधन टाकण्यात आले आहे.

या ३ सदस्यीय समितीमध्ये श्री श्री रविशंकर, न्या. खलीफुल्ला आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू या तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर १४ दिवसांनी समितीला न्यायालयात अहवाल सादर करायचा असून या समितीला अयोध्या विवादात मध्यस्थी करण्यासाठी आठ आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने या बाबत आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे समितीचे कामकाज गुप्त पध्द्तीने केले जाणार असून न्यायालयाची त्यावर करडी नजर असणार आहे.  न्या. खलिफुल्ला हे या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याच प्रमाणे या समितीच्या कामकाजाची माहिती प्रसार माध्यमात प्रदर्शित करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. समितीचे कामकाज हे कॅमेऱ्याच्या साक्षीने होणार असून या कामकाजाची कार्यवाही फैजाबादमधून होणार आहे.

अयोध्येत राममंदिर-बाबरी मशिदीच्या वादात अडकली आहे. आता हा २.७७ एकर वादग्रत जमीनचा वाद मध्यस्थांच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांच्यामध्ये आपसात विचार विनिमय करून हा वाद मिटवण्यात यावा अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी ३ सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

मला मराठ्यांची गरज नाही ; राणेंनी केला उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप

३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जमीनदोस्त’

हाफीज सईदला पुन्हा झटका ; ‘जमात’च्या मुख्यालयावर कारवाई

#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान