भूमीपूजनापुर्वी राजजन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 16 पोलिसांना देखील झालीय ‘लागण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे कोरोना (COVID-19) ने राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तयारी दरम्यान शिरकाव केला आहे. येथे साधू-संतांसमवेत रामजन्मभूमीच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. ताज्या बातमीनुसार रामजन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासमवेत रामजन्मभूमीचे पूजन करतात. विशेष म्हणजे राम जन्मभूमीतील मुख्य पुजारीसमवेत 4 पुजारी राम ललाची सेवा करतात.

रामजन्मभूमीच्या सुरक्षेत गुंतलेले 16 पोलीस कर्मचारी देखील पॉझिटिव्ह

आता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर पुजारी प्रदीप दास यांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचवेळी रामजन्मभूमीच्या सुरक्षेत गुंतलेले 16 पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यावरून खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला भेट देणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 ऑगस्टला अयोध्या येथे आगमन होणार आहे. पीएम मोदी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील सर्व मान्यवरही उपस्थित असतील. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट या भूमिपूजन कार्यक्रमाच्या भव्यतेत आणि प्रसिद्धीमध्ये कसलीही कसर सोडत नाही.

अयोध्येत सुरक्षा अधिक कडक

पंतप्रधानांच्या भेटीमुळे अयोध्येत सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. आयडी प्रूफ पाहिल्यानंतरच अयोध्या धाममध्ये लोकांना प्रवेश दिला जात आहे. अयोध्या धामला 7 झोनमध्ये विभागलेले आहे. यावेळी सर्व प्रवेश बिंदूंवर सखोल तपासणी सुरू आहे.

दोन वॉटरप्रूफ मंडप आणि एक स्टेज सजविण्यात येईल

दुसरीकडे राम मंदिर भूमिपूजनासाठी रामजन्मभूमी संकुलात मंडप बांधण्याचे काम सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 वॉटरप्रूफ मंडप बनवले जात आहेत. त्यात एक छोटे व्यासपीठही बांधले जाईल. या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री योगी, संघ प्रमुख मोहन भागवत, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे असतील. तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत मंडपामध्ये खुर्च्या लावण्यात येतील.