Ayodhya Ram Temple Opening | भाजपा मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ”राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्या, दारू -मांस बंदी करा”

मुंबई : आयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठापणा (Ayodhya Ram Temple Opening) सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्त सर्वच राज्यात भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. आता, २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर (Public Holiday) करावी, तसेच दारू आणि मांस बंदी करावी, अशी मागणी भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली आहे. यासाठी लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवले आहे. भाजपा आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनीही अशाच प्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. (Ayodhya Ram Temple Opening)

भाजपा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात, आयोध्येतील कार्यक्रमानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदी करावी. तसेच या दिवशी सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. (Ayodhya Ram Temple Opening)

तर भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून यामध्ये म्हटले आहे की,
अयोध्येमध्ये पाचशे वर्षांनंतर राममूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात
दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे.
त्यामुळे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करावी. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी,
अशी मागणी कदम यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त