Ayurvedic Remedies For Black Hair | केस काळे करण्यासाठी उपाय : केस पांढरे झाले आहेत का, मग अवलंबा ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayurvedic Remedies For Black Hair | अकाली केस पिकणे ही समस्या सध्या सर्वच वयोगटात दिसून येते. या समस्येवर बहुतांश लोक बाजारात मिळणारी विविध प्रकारची महागडी प्रॉडक्ट वापरून उपचार करताना दिसतात. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. मात्र, या समस्येवर काही घरगुती उपाय केल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात. (Ayurvedic Remedies For Black Hair)

 

हे उपाय करा
1. गावठी तुपाचा वापर केल्याने केस काळे होऊ शकतात. केसांना गावठी तूप लावून मसाज केल्याने काही दिवसातच फरक दिसू लागेल. आठवड्यातून दोनदा केसांना गावठी तूपाने मसाज करा. निरोगी केसांसाठी गावठी तूप खूप फायदेशीर आहे.

 

2. केस काळे करण्यासाठी गाजर देखील खूप उपयुक्त आहे. गाजराचा रस दररोज 250 ग्रॅम बनवा आणि त्याचे सेवन करा. हे केल्याने तुमचे पांढरे केस काळे होतील.

3. काळ्या तिळाचे सेवन केल्याने पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा एक चमचा काळे तीळ खाल्ल्याने लाभ होऊ शकतो.

 

4. कोरफड चेहरा आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा कोरफड जेल खूप प्रभावी आहे. कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांवर लावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ayurvedic Remedies For Black Hair | get rid white hair grey hair treatment ayurvedic remedies for black hair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे