Ayushman Bharat Digital Mission सोबत जोडली Indian Railways IRCTC ची हॉस्पिटल, 80 लाख कर्मचारी-पेन्शनधारकांना मिळणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ayushman Bharat Digital Mission | भारतीय रेल्वे (Indian Rail) च्या सुमारे 80 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. देशभरातील 695 रेल्वे रुग्णालये (Indian Railways IRCTC) आणि आरोग्य केंद्रे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (Ayushman Bharat Digital Mission) ABDM सोबत जोडण्यात आली आहेत.

 

या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असलेल्या रेलटेल (RailTel) ने शनिवारी (29 जानेवारी 2022) ही माहिती दिली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने RailTel च्या विधानाचा संदर्भ देत म्हटले आहे की,
रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये RailTel कडून यापूर्वी कार्यान्वित केलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (Hospital Management Information System : HMIS) जोडून एकत्रीकरण साध्य केले आहे.

 

निवेदनानुसार, या पावलामुळे केवळ 80 लाख रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा होणार आहे,
तसेच भारतीय रेल्वे रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचा डिजिटल पद्धतीने लाभ सर्वसामान्यांनाही मिळेल. (Ayushman Bharat Digital Mission)

 

असेही सांगण्यात आले आहे की, रेल्वेचे रुग्ण रेल्वे हेल्थ सिस्टीमच्या बाहेरून एबीडीएमशी संलग्न असलेल्या इतर हॉस्पिटलमध्ये विशेष उपचारासाठी देशात कुठेही जात असतील,
तर या एकात्मिक प्रणाली (Railway Health System) च्या मदतीने वैद्यकीय नोंदींची देवाणघेवाण करता येईल.
हे लाभार्थी किंवा रुग्णांसाठी गोष्टी सुलभ, जलद, त्रासमुक्त आणि चांगल्या बनवेल.

रेलटेलचे CMD पुनीत चावला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, RailTel देशात होत असलेल्या डिजिटल परिवर्तना (Digital India Initiative) शी संबंधित उपक्रमांसाठी आणि सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

कंपनीने अलीकडेच देशभरातील सर्व 695 रेल्वे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी पूर्ण केली आहे,
जी रेल्वेच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरली आहे.

 

चावला म्हणाले, आता रेल्वे एचएमआयएसचे ABDM सह एकत्रीकरण हा आणखी एक मैलाचा दगड आहे.
यामुळे लाभार्थीना ABDM इको सिस्टीमचा लाभ अखंड डिजिटल पद्धतीने मिळण्यास मदत होईल.

 

Web Title :- Ayushman Bharat Digital Mission | irctc 80 lakh indian railways employees pensioners benefit as hospitals integrated with ayushman bharat digital mission

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा