पंतप्रधान जन आरोग्य योजना PMJAY : 5 लाख रूपयांपर्यंत एकदम फ्री उपचाराचा घ्या लाभ, ‘हे’ आहेत नियम, पात्रता यादीत असं तपासा नाव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष्मान भारत योजनेत मोफत तपासणीपासून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासारख्या सुविधा दिल्या जातात. सर्वात खास बाब ही आहे की, कोरोनाची तपासणी सुद्धा तुम्ही नि:शुल्क करू शकता. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड सुद्धा डाऊनलोड करू शकता. जे लोक मोठ्या आजारांचा खर्च करू शकत नाहीत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

मोदी सरकार आयुष्मान भारत योजनेचे संचालन करत आहे. एबीवायला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुद्धा म्हटले जाते. ही योजना देशातील गरीब लोकांसाठी उपयोगी आणि हेल्थ इन्शुरन्स योजना आहे. एबीवायअंतर्गत देशात 10 कोटी कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्य मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे, रजिस्ट्रेशन कसे करावे, ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि लाभार्थीच्या यादीत तुमचे नाव कसे चेक कराल, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत…

काय आहे आयुष्मान भारत योजना
आयुष्मान भारत योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जाते. या योजनेत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याची तरतूद आहे. ही योजना केवळ गरीबांसाठी असून शहरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबे अर्ज करून लाभ घेऊ शकतात. आयुष्मान भारत योजना सार्वजनिक आणि खासगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आहे. यामध्ये प्रामुख्याने औषधं, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर होतो. या योजनेत सुमारे 1400 पॅकेज सहभागी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये गुडघ्याचे प्रत्यारोपण, कोरोनरी बायपास, स्टेंटिंगसारखे उपचार सामिल आहेत.

एक दृष्टीक्षेप :

योजनेचे नाव पंतप्रधान जनआरोग्य योजना (पीएम-जेएवाय) आणि आयुष्मान भारत योजना

लाभार्थीची पात्रता – भारतीय नागरिक असणे अनिवार्य

योजनेचा मुख्य लाभ – पीएम-जेएवायच्या कक्षेत येणार्‍या सर्व कुटुंबाना 5 लाख रुपयांपर्यंत विमा (कोरोना व्हायरस संक्रमणाची मोफत तपासणी आणि उपचार)

ऑफिशियल वेबसाइट www.pmjay.gov.in

संचलन करणारा विभाग – आरोग्य आणि कुटुंब कल्याण

या आहेत खास गोष्टी

रजिस्टर्ड लोक सरकारी, सार्वजनिक, आरोग्य केंद्रांशिवाय प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा उपचार करू शकतात.

योजनेंतर्गत उपलब्ध लाभ निर्देशित कुटुंबांना प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या बाहेर असणारी काही राज्य सोडून या उपचाराची सुविधा संपूर्ण देशात आहे.

या योजनेंतर्गत उपचारासाठी एक रूपयाचीही आवश्यकता नाही आणि हे पूर्णपणे नि:शुल्क आहे.

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लोकांना सामाजिक-आर्थिक जात जनगणना -2011 च्या आकड्यात आपले नाव तपासणे जरूरी आहे. जर या यादीत त्यांचे नाव असेल तर या आधारावर हे सिद्ध होते की, त्या कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांची नावे या जनगणना डेटाबेसमध्ये नोंदली आहेत, त्यांना प्रथम लाभ घेण्याचा अधिकार आहे.

ग्रामीण क्षेत्रासाठी पात्रता

एका खोलीचे कच्चे घर असणे पात्रता मानली जाईल.

ज्यांच्या कुटुंबात 59 वर्षापर्यंत कोणीही सदस्य नसेल तर ही पात्रता मानली जाईल.

शहरी क्षेत्रासाठी पात्रता

घरगुती काम करणारे असू शकतात.

वस्तू विक्रेता / चांभार / सुद्धा पात्र.

स्वीपर / स्वच्छता कार्यकर्ता / माळी

घरकाम करणारे सेवक

सोसायटीचा वॉचमन / चौकीदार

अशी चेक करा आयुष्मान भारत योजना लाभार्थी यादी 2020

या स्टेप्स फॉलो करा

सर्वप्रथम दिलेल्या लिंकवरून अधिकृत वेगसाइटवर जा.

https://www.pmjay.gov.in

होम पेजवर अ‍ॅम आय एलिजिबलच्या ऑपशनवर क्लिक करा.

येथे तुमच्यासमोर एक नवी पेज ओपन होईल. जेथे आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आधार नंबर, रेशनकार्ड नंबर, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना युआरएन इत्यादी तेथे दिलेल्या जागेत भरा.

यांनतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो नोंदवा.

येथे तुम्ही तुमच्या राज्याचे नाव निवडा आणि सर्च बटनवर क्लिक करा.

आता समोर एक यादी येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे.

आपल्या मोबाइल नंबरवरून लॉगिन करून जाणून घेऊ शकता की, तुमचे कुटुंब या योजनेत आहे अथवा नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही.

जर तुमचे कुटुंब पंतप्रधान जनआरोग्य योजना लिस्टमध्ये समाविष्ट आहे तर तुम्हाला वैद्यकीय उपचारासाठी निवडलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येईल.

आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड
आयुष्मान भारत कार्ड बनवणासाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. तसेच ऑनलाइन अर्ज करताना तुमच्याकडून कागदपत्र मागीतली जातील. ती पुढील प्रमाणे…

वयाप्रमाणे आवश्यक कागदपत्र

– आपल्या ओळखीची माहिती

– कुटुंबाची संपूर्ण माहिती

– वार्षिक उत्पन्नाचा दाखला

– जात प्रमाणपत्र

या राज्यांमध्ये लागू नाही योजना
सध्या तीन राज्यात आयुष्मान भारत योजना लागून नाही. या राज्यांमध्ये तेलंगना, ओडिसा आणि बंगाल आहे. या राज्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे अगोदरच खुप चांगल्या आरोग्य योजना आहेत.