पाकिस्तानमधील भारतीय वंशाचे नेते बी. एम. कुट्टी यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील भारतीय वंशाचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते बी. एम. कुट्टी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. 70 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या कुट्टी यांचा जन्म केरळमधील मलप्पुरम नगर येथे झाला होता, वयाच्या 19 व्या वर्षी ते पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले होते.

कुट्टी यांच्यामागे चार मुले असून त्यांच्या पत्नीचे 2010 मध्ये निधन झाले होते. भारत आणि पाकिस्तानमधील शांतता वाढावी यासाठी काम करणाऱ्या ‘पाकिस्तान पीस कोयलिशनचे’ ते महासचिव देखील होते. त्याचबरोबर पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. बलुचिस्तानच्या राज्यपालांचे राजकीय सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

2011 मध्ये त्यांनी आपल्या ‘Sixty years in self-exile: No Regrets; A Political Autobiography’ आत्मचरित्राचे प्रकाशन देखील केले होते. यात त्यांनी आपल्या केरळ ते पाकिस्तानमधील प्रवासाचे वर्णन केले आहे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कुट्टी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून ते कुट्टी हे एक प्रसिद्ध पत्रकार तसेच उत्तम नेते होते असेदेखील त्यांनी शोकसंदेशात म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या