डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच्या B.Tech च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले (तिरसंगी) डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच्या B. Tech च्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रॅगिंगमुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. धर्मराज दत्तात्रय इंगळे असं या तरुणाचं असून तो मंगळवेढा तालुक्यातील आकोला येथील रहिवासी होता. मंगळवेढा पोलिसांकडे त्याचा मेडिकल रिपोर्ट पाठवण्यात आला असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराजने पहाटे बागेत फवारन्यासाठी आणलेले विषारी तननाशक प्राशन केले. मंगळवेढा येथून सोलापुरात उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. हातकणंगले येथील डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या धर्मराजचे गॅदरिंगनंतर रूममधील मुलांशी बिनसले होते त्या कारणास्तव त्याने कॉलेजला जाण्यास नकार दिला होता. त्याच्या आत्महत्या करण्यामागे कॉलेजमध्ये त्याला सहकाऱ्यांनी दिलेला त्रास आहे असा इंगळे कुटुंबीयांचा आरोप आहे.

धर्मराजचे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्यामुळं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –