अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ‘डरपोक’, ‘या’ बड्या तपास अधिकार्‍याचा ‘धक्‍कादायक’ खुलासा

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाउद इब्राहिमची चौकशी केलेल्या अधिकाऱ्याने एका पुस्तकाच्या माध्यमातून मोठे खुलासे केले आहेत. त्यामध्ये लिहिण्यात आले आहे की, दाउद इब्राहिम हा एक सामान्य आणि डरपोक माणूस आहे. त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली होती. भारतीय सीमा शुल्क विभागाचे पूर्व निर्देशक बी. वी. कुमार यांनी त्यांच्या ‘डीआरआय ऐंड डॉन्स’ या नवीन पुस्तकात ही गोष्ट सांगितली आहे.

अधिकारी पुस्तकात लिहितात की, अंडरवर्ल्डमधील एक प्रसिद्ध गुन्हेगार रशीद अरबा यांनी दाऊद इब्राहिम याच्या सुरवातीच्या ठिकाणांची माहिती दिली होती.

कुमार यांनी सांगितले की, DRI दाऊदला ताब्यात घेण्यात आणि चौकशी करण्यासाठी प्रमुख भूमिकेत होती. मी जेव्हा दाऊदला अटक केली तेव्हा गुजरातच्या उच्च न्यायालयात या प्रकरणाची तत्काळ कारवाई सुरु करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. राम जेठमलानी यांनी डॉन ची बाजू मांडली होती.
हे प्रकरण बी.वी. कुमारने दाखल केले होते. कुमार IRS अधिकारी असून त्यांनी DRI सह NCB चे देखील नेतृत्व केले आहे. त्यांचे करिअर खूप छान राहिले. त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांना वठणीवर आणले.

दाऊदने सर्वांना खरेदी केले
कुमार यांना जेव्हा असं विचारण्यात आले की, दाऊद आशियातील सर्वात मोठ्या गुन्हेगारात कसे सामील झाले. तेव्हा ते म्हणाले की, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता या मागील प्रमुख कारण आहे. दाऊदने सर्वांना पैसे देऊन खरेदी केले. बॉलिवूडचे कलाकार, राजकीय नेते तसेच क्रिकेटर यांना देखील त्याने खरेदी केले होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,