Dus Bahane Song : टायगर-श्रद्धाचं Baaghi 3 चं नवं गाणं ‘फुलटू’ भन्नाट, डान्स अन् ‘बोल्ड’नेसचा ‘ओव्हर’डोस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चनचा दस हा सिनेमा 2005 साली आला होता. या सिनेमातील दस बहाने हे गाणं खूप गाजलं. हे गाणं सर्वाज जास्त ऐकलं आणि पाहिलं गेलं. सिनेमा चालला नाही परंतु विशाल-शेखरचं हे गाणं सुपरहिट झालं. आता हेच गाणं बागी 3 सिनेमाच्या मेकर्सनी रिक्रिएट केलं आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या बागी 3 सिनेमातील दस बहाने 2.0 हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

टायगर-श्रद्धाचा अप्रतिम डान्स

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे दोघेही अप्रतिम डान्सर आहेत यात काही शंका नाही. या गाण्यातही दोघांनी अप्रतिम डान्स मुव्स केल्या आहेत. तुम्हीही त्यांच्या डान्सचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. या गाण्यात टायगरनं आपली सिक्स पॅक बॉडीही फ्लाँट केली आहे. गाणं प्ले करताच तुम्ही एका वेगळ्या दुनियते जाता. टायगर श्रॉफ कधी हॅलिकॉप्टरपाशी तर कधी बर्फाळ डोंगरांवर थिरकताना दिसतो. या गाण्यात श्रद्धा कपूरचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच बागी 3 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चाहत्यांचा याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ मोठ्या मशीन्स आणि हॅलिकॉप्टर्समध्ये खतरनाक स्टंट्स करताना दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमातील स्टोरीचा काही प्रमाणात अंदाज येतो. सिनेमात जबरदस्त अॅक्शन दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसतंय की टायगर आपल्या भावाला वाचवण्यासाठी सीमा ओलांडण्यासाठी तयार आहे. तो भावाला वाचवण्यासाठी अगदी सीरीया पर्यंत जात आहे. त्याच्या भावाची भूमिका रितेश देशमुखनं साकारली आहे.