शासनानं शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं आहे, भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील : बाबा आढाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार हमी भावा ची अंमलबजावणी ची जवाबदारी टाळत आहे. घोषणा करून कायदे बदलत आहे. असे करून आणीबाणी सदृश्य भय लादण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर भविष्यात यांचे गंभीर परिणाम होतील. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

त्यामुळे देशात वेगळेच वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोक्याचा इशारा असेल हे सरकारने लक्षात ठेवावे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी बाबा आढाव म्हणाले की, मी 70 वर्ष चळवळीमध्ये असून सरकार आमच्या सारख्या जेष्ठ व तज्ञ व्यक्तींशी बोलण्यास तयार नाही. यामुळे आमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता सरकारची आहे. असे त्यांनी सांगितले.