आमदारांना पगार नका देऊ, शेतकऱ्यांना मदत करा, ‘या’ राज्यमंत्र्याची सरकारकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार देऊ नका, एवढेच नाही तर आयएएस अधिकाऱ्यांना देखील तीन महिने पगार देऊ नका, मात्र शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं धोरण आखायला पाहिजे असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

एका बाजूला सर्व आमदारांनी पगार वाढवण्याची मागणी सुरु केली असताना दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांनी आमदारांना पगार देऊ नका असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून आमदारांच्या पगार वाढीच्या मागणीला विरोध करत आहेत. आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ सुरु असताना नोव्हेंबमध्ये राज्यात तिनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा आकडा सर्वाधीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व संस्थांनी एकत्र येऊन यावर एक धोरण आखले पाहिजे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/