Chandrapur ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना सार्वजनिक बंधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत (Central Government Scheme) बांधलेल्या पुलाचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात आणि उर्वरीत पुलाचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department), जिवती उपविभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Chandrapur ACB Trap) रंगेहात पकडले. चंद्रपूर एसीबीच्या पथकाने (Chandrapur ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर) केली.
अनिल जगन्नाथ शिंदे Anil Jagannath Shinde (वय-27) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे (Junior Engineer) नाव आहे. याप्रकरणी चंद्रपूर येथील 28 वर्षाच्या ठेकेदाराने चंद्रपूर एसीबीकडे (Chandrapur ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जिवती तालुक्यात पुल बांधण्याचे (Bridge Construction) काम केले आहे. तक्रारदार यांनी चार पूल बांधले असून त्यापैकी दोन पुलाचे बिल मंजुरीसाठी पाठवले होते. ते बिल मंजुर झाल्यानंतर उर्वरीत दोन पुलांचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी अनिल शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 8 जून 2022 पडताळणी केली असता अनिल शिंदे यांनी बांधलेल्या दोन पुलांची बिले मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना अनिल शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र (Nagpur Region) पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे (DySP Avinash Bhamre),
पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे (Police Inspector Shilpa Bharde), पोलीस अंमलदार रमेश दुपारे,
नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, मेघा मोहुर्ले यांच्या पथकाने केली.
Web Title :- Chandrapur ACB Trap | Junior Engineer of Public Bonds Department in anti-corruption net while accepting bribe of 2 lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास
Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’