Bachchu Kadu | ‘….लोकं एवढी मूर्ख राहिली आहेत का?’, उद्धव ठाकरेंच्या सभेवर बच्चू कडूंची टीका

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी (दि.26) मालेगावात जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या खेड मतदारसंघात सभा घेतली होती. त्यानंतर ते दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाष्य केलं आहे. सभेनं वातावरण आणि लोकांची मन बदलतात असं नाही, लोकं एवढी मुर्ख राहिलेली आहेत का?, अशी टीका बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, सभेनं वातावरण आणि लोकांची मन बदलतात, असं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्याही (Balasaheb Thackeray) सभा खूप मोठ्या होत असतं. मात्र, मनपरिवर्तन होण्यासाठी अनेक वर्षे गेली. 20 वर्षानंतर शिवसेनेची (Shivsena) सत्ता आली. जमिनीवर शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहवं लागतं. सभा घेतली आणि तेथील लोकांनी दुसरा आमदार निवडून दिला, असं थोडीच होतं. लोक एवढी मूर्ख राहिली आहेत का? बच्चू एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
गर्जनेपेक्षा काम महत्त्वाचे
गर्जनेपेक्षा काम महत्त्वाचं आहे. कोणाची पोट भरली गर्जनेने? इथं मंदिर बांधा, तिथं मस्जिद बाधा… तिथले भोंगे काढा, इथले भोंगे राहुद्या… हे काय देशाचे प्रश्न नाहीत. रोज भुकबळीने लोक मरत आहेत. औषधोपचाराची व्यवस्था नाही. कष्टकरी, शेतकरी यांचे हाल काय आहेत? असेही बच्चू कडू म्हणाले.
लोक एवढी मुर्ख राहिले नाहीत
बच्चू कडू पुढे म्हणाले, लोकं एवढी मूर्ख राहिलेली नाहीत. झेंडा बदलला म्हणजे लोक प्रवाहात वाहून जातील, असं नंसतं.
लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न आहे. नाशिकमध्ये द्राक्ष, कांद्याचा भाव असे प्रश्न आहेत.
कांद्याला भाव मिळाला नाही तरी चालेल.
पण मस्जिदीवरील भोंगा बंद झाला पाहिजे, हे कोण ऐकणार? असा सवाल देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
Web Title :- Bachchu Kadu | mla bacchu kadu on uddhav thackeray nashik malegaon sabha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस
Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत