Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात गेला आठवडाभर प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांनी गुवाहाटीला जाऊन 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कडू संतापले आहेत. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राणांना 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे मागितले आहेत. अन्यथा आपण आपल्यासोबत असलेल्या 8 – 10 आमदारांना घेऊन वेगळा विचार करणार असल्याचे शिंदे-फडणवीसांना सांगितले आहे.

 

बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्त वाहिनीसोबत संवाद साधला. यावेळी कडू म्हणाले, आम्हाला खोकेवाले आमदार म्हंटले जात असल्याने दु:ख होते. शिंदे गटातील (Shinde Group) सर्व 50 आमदारांचे ते दु:ख आहे. त्याबाबत काही आमदारांनी मला फोन करत या अपमानातून आणि त्रासातून मोकळे होण्याची इच्छा व्यक्त केली. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. पण, गुवाहाटीला गेल्यानंतर जनतेचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून गेला आहे. आम्हाला या तडजोडीचे दुष्परिणाम भोगावे लागले. राजकारणात तडजोडी करणे ह्या आजच्या गोष्टी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Maratha King Shivaji) देखील या तडजोडी केल्या होत्या. मुघलांना शह देण्यासाठी निजामांना त्यांनी हाती धरले होती, असे कडू (Bachchu Kadu) यावेळी म्हणाले.

राजकारणात कोणाला पाठिंबा दिल्याने किंवा कोणासोबत गेल्याने पैसेच घेतले असावेत, असा अर्थ होत नाही.
रवी राणा अगोदर राष्ट्रवादीच्या (NCP) पाठिंब्यावर निवडून आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला.
त्यामुळे आता त्यांनी पैसे घेतले, असे आम्ही म्हणायचे का?, असे कडू यावेळी म्हणाले.
कडू राणा वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मध्यम मार्ग काढतील,
असे भाजप (BJP) आणि शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.
तसेच कडू यांनी दिलेल्या 1 तारखेच्या मुदतीला अवघे दोन दिवस बाकी असल्याने ते काय भूमिका घेणार,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Bachchu Kadu | shinde group mla bachchu kadu commented on political compromise of guwahati trip and ravi ranas khoke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

Nitin Gadkari | ‘देशात ई-महामार्ग आणि ई-ट्रक आणण्याचा देखील आमचा संकल्प’ – नितीन गडकरी

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी