Potassium Rich Foods | पोटेशियमच्या कमतरतेमुळे येऊ शकतो थकवा आणि कमजोरी, आजपासून खायला सुरूवात करा ‘हे’ 5 फूड्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Potassium Rich Foods | पोटॅशियम हे खनिज आहे. ज्याची शरीराला खूप गरज असते. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हायपोकेलेमिया (Hypokalemia) होऊ शकतो. ही अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यामध्ये पोटॅशियमची कमतरता एकतर योग्य आहार न घेतल्याने सुरू होते किंवा अतिसार आणि उलट्यांमुळे शरीराला ते मिळू शकत नाही (Potassium Rich Foods). जेव्हा तुम्हाला हे पोषकतत्व मिळत नाही, तेव्हा रक्तदाब, बद्धकोष्ठता, स्नायूंचा कमकुवतपणा आणि थकवा यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत हा धोका दूर करण्यासाठी खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतात (Potassium Based Diet).

 

1. दूध (Milk)
दूध हे पूर्ण अन्न आहे, त्यात सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात, त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळते. जर तुम्ही एक कप लो फॅट दूध प्यायले तर 350 ते 380 मिलीग्राम पोटॅशियम मिळते.

 

केला

 

2. केळी (Banana)
केळ्यामध्ये इतर अनेक पोषक तत्वांव्यतिरिक्त पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते. जर मध्यम आकाराचे केळी खाल्ले तर सुमारे 422 मिलीग्राम पोटॅशियम मिळते. (Potassium Rich Foods)

 

आलू

 

3. बटाटा (Potatoes)
बटाट्याला भाजीचा राजा म्हटले जाते. बटाटे शिजवताना त्याची साल काढली नाही तर शरीराला 900 मिलीग्रॅमपेक्षा जास्त पोटॅशियम मिळेल.

 

सीफूड

 

4. सीफूड (Seafood)
सॅल्मन (Salmon), मॅकेरल (Mackerel), हॅलिबट (Halibut), ट्यूना (Tuna) आणि स्नॅपर (Snapper) सारख्या सागरी माशांच्या 3-औंस प्रमाणात 400 मिलीग्रामपेक्षा जास्त पोटॅशियम असते.

 

पालक

 

5. पालक (Spinach)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. अर्धी वाटी पालक शिजवून खाल्ल्याने शरीराला सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम (Potassium) मिळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Potassium Rich Foods | potassium rich foods potatoes seafood spinach milk bananas deficiency hypokalemia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | पुण्यात कर्तव्य बजावत असताना जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

Pune Rain | संततधार पावसामुळे पुण्यात मुठेला पूर ! खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप