‘बदलूराम का बदन’वर ‘मनसोक्‍त’ नाचले ‘भारतीय – अमेरिकी’ सैनिक (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये सध्या भारतीय सैन्याचा युद्ध अभ्यास सुरु असून यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय जवान एका गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे है’ या गाण्यावर डान्स करताना भारतीय सैनिक दिसून येत आहेत. वॉशिंग्टनमधील लष्करी तळावर सध्या अमेरिकन आणि भारतीय सैन्याचा युद्ध अभ्यास सुरु आहे. त्यावेळी आसाम रायफलच्या जवानांनी या गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे गाणे आसाम रेजिमेंटच्या शाहिद बदलूरामच्या शौर्यतेवर बनवण्यात आले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी सेनेबरोबर संघर्ष करत असताना ते शाहिद झाले होते. त्यानंतर देखील त्यांचे नाव लष्करातून हटविण्यात आले  नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने राशन येत होते आणि भारतीय सैनिकांना ते मिळत असे. तेव्हापासून हे गाणे चर्चेत आले आहे. या वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात देखील सिक्कीम बॉर्डरवर झिरो तापमानात देखील आसाम रेजिमेंटचे सैनिक या गाण्यावर डान्स करताना दिसून आले होते.

दरम्यान, दोन्ही देशाचे सैन्य सध्या एकत्रित युद्ध अभ्यास करत असून हा युद्ध अभ्यास एक वर्ष भारतात तर एक वर्ष अमेरिकेत आयोजित केला जातो.

You might also like