दिलदारपणा ! बाहुबलीनं जिम ट्रेनरला दिली मोठी भेट

पोलिसनामा ऑनलाईन – तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ‘बाहुबलीचा अभिनेता प्रभासच्या दिलदारपणाचा जिम ट्रेनरला अनुभव आला आहे. नुकताच प्रभासने जिम ट्रेनरला एक महागडी कार गिफ्ट म्हणून दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभास जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे. नुकताच प्रभासने त्यांना रेंज रोवर वेलार ही कार भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत जवळपास 73 लाख रुपये आहे.

प्रभासने जिम ट्रेनरला अलिशान मोटार दिल्यामुळे चर्चेला वाव आल असून त्याच्या दिलदारपणाचे कौतुक केले जात आहे. त्याचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पुजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाता फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. प्रभासचा आणखी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘आदिपुरुष’ असे आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे.