बकरी ईदच्या निमित्‍ताने ‘ऑनलाईन’ विकत घ्या ‘बकरा’, 3 लाख रूपयांपर्यंत किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकालच्या या इंटरनेटच्या युगात माणूस जवळपास प्रत्येक वस्तू ऑनलाईन विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक सणांना आणि कार्यक्रमांसाठी माणूस ऑनलाईन खरेदी करत असतो. मात्र आता ईद जवळ आल्याने मुस्लिम बांधवानी देखील ऑनलाईन बकरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक मुस्लिम बांधव या खास दिवसासाठी ऑनलाईन बकरे खरेदी करत आहेत.

बाजारात जास्त किमतीमुळे त्रासलेल्या काही मुस्लिम बांधवानी ऑनलाईन बकरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. या ठिकाणी त्यांना पाच हजारापासून लाखो रुपयांपर्यंतचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या जातीचा बकरा हवा आहे, याचीदेखील चौकशी करता येते. बाजारात तुम्हाला यासाठी शंभर फेऱ्या माराव्या लागतील मात्र ऑनलाईन तुम्हाला घर बसल्या या सर्व गोष्टींची चौकशी करता येईल. बकरी ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधव आपल्या कुवतीप्रमाणे बकरांची कुर्बानी देत असतो.

या खरेदीच्या अनुभवाविषयी बोलताना नागरिकांनी सांगितले कि,ते ओएलएक्स तसेच अन्य साईटवरून बकरे खरेदी करत आहेत. या वेबसाईटवर जगभरातील प्रजातींचे बकरे तुम्हाला विकत मिळू शकतात. या ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहाराविषयी बोलताना व्यापाऱ्यांनी सांगितले कि, बाजारात येईपर्यंत या बकऱ्याचे भाव खूप वाढलेले असतात, त्यामुळे नागरिक इतके महाग विकत घेत नाहीत. मात्र जर ऑनलाईन घेतले तर सरळ विक्रेत्यांशी त्यांचा संपर्क होत असल्याने त्यांना ते स्वस्त मिळते.
image.png
दरम्यान, या ऑनलाईन बकरा खरेदीमध्ये तुम्ही एखादा बकरा न आवडल्यास बदलून देखील घेऊ शकता. मात्र खुल्या बाजारात तुम्हाला तो बदलून मिळत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये हि ऑनलाईन खरेदीची आवड वाढल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –