Nirbhaya Case: चारही दोषींना फाशी दिल्याने होळीच्या उत्सवात मग्न झाले निर्भयाचे गाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गॅंगरेपच्या दोषींना सकाळी दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी दिल्यानंतर बलिया येथे निर्भयाच्या गावात उत्सव सुरू झाला आहे. संपूर्ण गाव आज या ऐतिहासिक दिवशी होळी साजरी करत आहे. नवी दिल्लीत निर्भयाच्या आई-वडिलांनीही सांगितले की, गावातून फोन आला आहे. ते लोक रात्रीपासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या कारवाईवर नजर ठेऊन होते. त्यांनी उत्सवाची आधीच तयारी केली होती. निर्भयाच्या आईने सांगितले की त्या उत्सव तर साजरा नाही करणार, परंतु मुलीला न्याय मिळाल्याचा त्यांना आनंद आहे.

निर्भयाच्या वडिलांनी सांगितले की, रात्रभर संपूर्ण गाव फोन करत प्रत्येक सेकंदाची बातमी घेत होते. इथे गावात निर्भयाच्या बाबा आणि काकांनीही रात्रभर जागे राहण्याची घोषणा केली होती, जेणेकरुन त्यांना सकाळी योग्य वेळी फाशी देण्याची माहिती मिळेल. शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात निर्भया प्रकरणातील चार दोषी-मुकेश, पवन, विनय आणि अक्षय यांना पवन जल्लादने फाशी दिली.

उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील नरही परिसरात निर्भयाचे गाव आहे. निर्भया गावातील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी पांडे म्हणाल्या की, गावात अबीर-गुलाल इत्यादींची खरेदी आधीच झाली होती. आज आम्ही दिवसभर निर्भयाला न्याय मिळाल्याने उत्सव साजरा करू.