पाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा, टेक्सासमध्ये पाणी पुरवठ्यावर बंदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या टेक्सास प्रांताच्या दक्षिणपूर्व भागात पाणीपुरवठा करताना पाण्यात अमीबा (brain-eating amoeba) आढळल्यानंतर आठ शहरांमधील रहिवासीयांना सतर्क करण्यात आले आहे. हा अमीबा ब्रेन म्हणजेच मानवी मेंदू खाणारा असल्याचे सांगितले जात आहे. टेक्सास प्रशासनाने असा इशारा दिला आहे की सर्वांनी सावधगिरी बाळगावी अन्यथा हा हाहाकार माजवेल. टेक्सास कमिशनने पर्यावरणीय गुणवत्तेच्या आधारे वॉटर अ‍ॅडव्हायजरी जारी करत तेथील रहिवाशांना सतर्क केले आहे की, पाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू खाणारा अमीबा सापडला आहे, म्हणून तेथील पाण्याचा वापर त्वरित बंद करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

येथे आढळू शकतो मेंदू खाणारा अमीबा

पर्यावरणाची गुणवत्ता लक्षात घेऊन टेक्सास कमिशन ब्राझोस्पोर्ट वॉटर अ‍ॅथॉरिटीबरोबर सध्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम काम सुरु केले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार मेंदू कुरतडणारा हा अमीबा सामान्यत: माती, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळतो. स्वच्छता नसणाऱ्या स्विमिंग पुलमध्येही हा अमीबा आढळू शकतो. हा अमीबा औद्योगिक प्लॅंटमधून निघणाऱ्या गरम पाण्यात देखील आढळून येतो.

या भागातील लोकांना पाणी न वापरण्याचा सल्ला देण्यात आला

लेक जॅक्सन, फ्रीपोर्ट, अँगलटन, ब्राझोरिया, रिचवुड, ऑयस्टर क्रीक, क्लुट आणि रोजनबर्ग भागांसाठी पाण्याचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टेक्सास प्रांतामधील डाऊ केमिकल प्लॅंट आणि क्लेमेन्स आणि वायने स्कॉट टेक्सास डिपार्टच्या क्रिमिनल जस्टिस येथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अमीबा युक्त पाण्याच्या वापरामुळे संकटाची शक्यता असल्याचे लेक जॅक्सन परिसरात सांगण्यात आले आहे. पाण्यात अमीबा सापडल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी समोर आली होती. 6 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले तेव्हा अमीबा असल्याची बाब समोर आली.