लाखोंच्या दागिन्यासह अलिशान कार लंपास

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बंद बंगल्याचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अलिशान गाडी चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवार) सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी २० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. चोरट्यांनी पकडले जाऊ नये यासाठी सीसीटीव्हीची तोडफोड करून डिव्हिआर चोरून नेला.

मिळालेल्या माहितीनुसार निखिल मुळे (वय-३०) यांचा बालाजी पार्क येथे जिजाऊ नावाचा अलिशान बंगाला आहे. या बंगल्यामध्ये ते आणि त्यांची आई उर्मिला (वय-५०) राहतात. निखिल यांना कंपनीचे काम असल्याने ते शनिवारी रात्री सोलापूर येथे गेले होते. तर आई त्यांच्या भावाकडे राहण्यास गेली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याचे कडी कोयंडे तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख ७५ हजार आणि १७ लाख रुपयांची अलिशान कार असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

निखिल हे आज सकाळी घरी आले असता त्यांना घराचे गेट उघडे दिसले. तसेच घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील पाच खोल्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले. श्वान पथक रामानंदनगर रोडच्या दिशेने काही अंतर गेल्यानंतर घुटमळले.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे नवनाथ घोगरे, लक्ष्मीपुरीचे वसंत बाबर, शाहुपुरीचे संजय मोरे यांनी घटनास्थाळाला भेट दिली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले असून पोलिसांनी परिसराती सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप