बंगळुरू पोलिसांनी ‘Swiggy’ बद्दल केलं विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगळुरु पोलीस ट्रॅफिक नियम आणि रस्त्यावरील वाढती वर्दळ पाहता पिझ्झा कंपनी आणि इतर फूड डिलिव्हरी कंपन्यांना पिझ्झाच्या डिलिव्हरच्या अंतिम मुदत वाढवण्याचा विचार करत आहे. आज सकाळी बंगुळुरू पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “आपण एवढे लालची आहोत का, की केवळ एका फ्री पिझ्झ्यासाठी कोणाचा जीव धोक्यात घालू शकतो. पिझ्झा कंपन्यांना हा टाईम वाढवून 40 मिनिटांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यासाठी सल्ला देणार आहे. कारण ही मुलं ट्राफीक रुल्स तोडून आपला जीव धोक्यात घालतात.”

रोझी नावाच्या एका तरुणाीनं या ट्विटचं समर्थन केलं आहे. ती म्हणते, “तुम्ही नक्कीच असं करा. कारण 30 मिनिटात फ्री पिझ्झासाठी जीव धोक्यात घालणं एकदम चुकीचं आहे. अशा अंतिम मुदती त्वरीत बंद करायला हव्यात.”

आणखी एकानं म्हटलं आहे की, “मी काल स्विगी, झोमॅटोमध्ये काम करणाऱ्याला सिग्नल तोडताना, ओवरटेक करताना, ओवरस्पीड राईड करताना पाहिलं आहे. याचं कारण हेच की, वेळेत डिलिव्हरी करता यावी. त्यांना जीव धोक्यात घालताना पाहून मला चिंता वाटते.”

या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना Swiggy Cares नं उत्तर दिलं आहे की, “आम्ही तुमची चिंता समजू शकतो. आम्ही कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन करण्याच्या घटनेचं समर्थन करत नाहीत. जर तुम्हाला असं काही आढळून आलं तर कृपया आम्हाला 080-46866699 या नंबरवर संपर्क करा आणि सांगा. तुमचा दिवस शुभ असो.”

भास्कर राव यांनी स्विगीचं ट्विट रिट्वीट करत म्हटलं आहे की, “ज्याप्रमाणे तुम्ही स्विगीत काम करणाऱ्या मुलांची काळजी करता आणि जीवनाचं मूल्य तुम्हाला कळतं ते खरंच कौतुकास्पद आहे.”

फेसबुक पेज लाईक करा –