1 नोव्हेंबर पासुन बँका उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात बँकांची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व बँका एकाच वेळी उघडल्या जाणार आहेत. या नवीन निर्णयात बँका सकाळी 10 वाजता उघडणार असून संध्याकाळी 5 वाजता बंद केल्या जाणार आहेत. मात्र पैशांचे व्यवहार हे दुपारी 3 वाजेपर्यंतच केले जाणार आहेत. हे नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार असून अर्थ मंत्रालयाने वेळ बदलाचे आदेश दिले होते.

याआधी प्रत्येक बँकेची वेळ हि वेगळी होती. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बँकेतील कामकाज चालत असे. तर काही बँकांची वेळ हि 9 ते 3 अशी असे. कमर्शियल अ‍ॅक्टिव्हिटीची वेळ देखील बदलण्यात आली आहे. यापुढे याची वेळ हि सकाळी ११ वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच काही बँकांची कामाची वेळ हि 10 ते 5 इतकी करण्यात आली आहे.

बँकांसाठी तीन वेळा –
सरकारने सर्व बँकांशी विचार करून हि वेळ ठरवण्यात आली असून ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने हि वेळ ठरवली आहे. त्यामुळे बँकेच्या तीन वेळा ठरवण्यात आल्या असून पहिली वेळ हि 9 ते 3 करण्यात आली आहे. दुसरी वेळ हि 10 ते 4 तर तिसरी वेळ हि 11 ते 5 अशी ठरवण्यात आली आहे. हे नियम शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील लागू होणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी