खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेकडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, गृह-वाहन कर्ज झालं स्वस्त

पोलिसनामा ऑनलाइन – खास ग्राहकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सोमवारी मोठी घोषणा केली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (Repo Linked Lending Rate -RLLR) वर आधारित व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. या निर्णयानंतर नवीन व्याजदर 6.90 टक्क्यांवर आलं. आरएलएलआर आधारित सर्व कर्जांवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी होईल. परिणामी ग्राहकांना त्याच्या EMI वर 0.15 टक्क्याने दिलासा मिळणार आहे. याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फी न आकारण्याची घोषणा देखील केली आहे.

या सरकारी बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (Repo Linked Lending Rate -RLLR) वर आधारित व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने देखील व्याजदरात कपात केली आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या गृहकर्जासाठी 10 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. बँकेच्या निवेदनात म्हटले आहे, की महिला कर्जदारांना अशा कर्जासाठी या कपातीनंतरही अतिरिक्त सूट मिळेल. हे नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याजदर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेने गृहकर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि एमएसएमई वरील व्याज इ.मध्ये 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. बँकेंचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर हेमंत टमटा यांच्या मते सणासुदीच्या काळात बँकेने गृह, वाहन आणि गोल्ड लोनवरील प्रोसेसिंग फी देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महिलांना अतिरिक्त 0.05 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात (आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स) काम करणाऱ्यांना देखील अतिरिक्त 0.05 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

बँक ऑफ बडोदा, युनियन बँकेने घटवलं व्याजदर

देशातील तिसरी मोठी बँक असणाऱ्या BOB ने रेपो रेटवर आधारीत व्याजदर (BRLLR) 6.85 टक्के केले आहेत. हे दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. याआधी बँक ऑफ बडोदाने देखील त्यांच्या ग्राहकांना दिवाळी भेट देत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने देखील व्याजदरात कपात केली आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या गृहकर्जासाठी 10 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. महिला कर्जदारांना अशा कर्जासाठी या कपातीनंतरही अतिरिक्त सूट मिळेल. हे नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत, बँकेने अशी माहिती दिली.